प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी कोरोनामुळे एकही बळ गेला नाही तथापी 75 नवे बाधित सापडले तर 104 जण बरे होऊन घरी परतले. संशयित रुग्ण म्हणून 27 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 60 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सध्या 1141 एवढे सक्रीय कोरोना रुग्ण असून बळी नसल्याने मृतांचा आकडा स्थिर म्हणजे 677 एवढाच राहिला आहे. आतापर्यंत एकूण 46901 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 45082 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
डिचोली 23, सांखळी 38, पेडणे 28, वाळपई 16, म्हापसा 44, पणजी 86, हळदोणा 17, बेतकी 23, कांदोळी 67, कासारवर्णे 8, कोलवाळ 20, खोर्ली 44, चिंबल 55, शिवोली 41, पर्वरी 78, मये 10, कुडचडे 17, काणकोण 21, मडगाव 93, वास्को 69, बाळ्ळी 10, कासावली 36, चिचिणी 27, कुठ्ठाळी 47, कुडतरी 18, लोटली 21, मडकई 12, केपे 14, सांगे 7, शिरोडा 21, धारबांदोडा 12, फोंडा 82, नावेली 36.
या चालू नोव्हेंबर महिन्यात तीन वेळा म्हणजे तीन दिवस कोरोनाचा एकही बळी गेला नाही तरंतु नंतर पुन्हा बळींचे सत्र चालू झाले.
23 नोव्हेंबरपर्यंतचे कोरोना रुग्ण 46901
23 नोव्हेंबरपर्यंत बरे झालेले रुग्ण 45083
23 नोव्हेंबरपर्यंतचे सक्रीय कोरोना रुग 1141
23 नोव्हेंबरचे नवीन रुग्ण 75
23 नोव्हेंबर रोजी बरे झालेले रुग्ण 104
23 नोव्हेंबरचे करोना बळी 0
आतापर्यंत एकूण बळी 677