म. ए. समिती महिला आघाडीची बैठक
बेळगाव :
म. ए. समिती महिला आघाडीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा कोरोनामुळे काळा दिनावर बंधने आली आहेत. त्यामुळे म. ए. समिती काळय़ा दिनाविषयी जो निर्णय घेईल, त्या निर्णयाचे पालन करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर हा दिवस गांभीर्याने पाळून निषेध नोंदविण्यात येईल. सर्व महिलांनी 1 नोव्हेबर काळय़ा दिनी सहभागी व्हावे. त्याबरोबर या दिवशी काळे कपडे, काळे मास्क व दंडाला काळी फित बांधून निषेध नोंदवावा, असे आवाहन माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी केले आहे.
म. ए. समिती काळय़ा दिनाविषयी जी रूपरेषा ठरवेल, तिचे सर्व महिलांनी पालन करावे. याविषयी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला महिला आघाडीच्या सचिव सरिता पाटील, प्रिया कुडची, मंजुश्री कोलेकर, आशा सुपली, अर्चना कावळे, कांचन भातकांडे, अनुपमा कोकणे, श्रद्धा मंडोळकर, राजश्री बांबुळकर, राजश्री बडमंजी आदी उपस्थित होत्या.