इंधन दरवाढीविरोधात मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे आंदोलन ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीच्या निषेधार्थ सोमवारी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने देशव्यापी काळा दिवस पाळण्यात आला. जिल्हा, तालुका स्तरावर इंधन दरवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात माहिती देताना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले, इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीबद्दल केंद्र शासनाचा निषेध करण्यासंदर्भात देशातील सर्व जिल्हा संघटनांना काळा दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी ब्लॅक डे पाळत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हÎातील विविध तालुकास्तरावरही हे आंदोलन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचेउपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर, गोविंद पाटील, उत्तम पसारे, लोकल मालधक्का वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय कडवेकर, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, खजानिस सुभाष अढावकर, संचालक विजय भांडवलकर आदी उपस्थित होते.