दापोली-करंजाळी येथील शेतीला विद्यापीठ अधिकाऱ्यांनी दिली भेट, धाडसी पयोगाचे कौतुक
प्रतिनिधी / दापोली
जगात सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्याव औषध कंपन्यांकडून देखील मोठी मागणी असणाऱ्या काळ्या तांदळाची दापोली तालुक्यातील करंजाळी येथे शेती करण्यात आली आहे. या शेतीची दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दखल घेतली असून प्रकल्पाला विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. अधिकाऱयांनी धाडसी प्रयोगाचे कौतुक केले असून विद्यापीठाच्या दोन प्रादेशिक भात संशोधन केंद्रांत याचा तुलनात्मक अभ्यास सुरू आहे.
करंजाळी येथील अभिषेक सुर्वे या 26 वर्षांच्या अभियंता असलेल्या युवकांने आपल्या शेतात चाकहो जातीच्या काळ्या तांदळाची शेती केली आहे. या अनोख्या शेतीची बातमी ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. यानंतर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी वनस्पतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. एम. बुरोंडकर, कृषी वनस्पती शास्त्राचे भात पैदासकार आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दळवी, कृषी वनस्पतिशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पेठे यांनी या क्षेत्राला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी अभिषेक सुर्वे याचे कौतुक केले. कोकणामध्ये पारंपरिक शेती वगळता अन्य शेती करण्याचा धाडसी निर्णय सुर्वे यांनी घेतल्यामुळे त्यांनी आनंद व्य‹ केला. काळ्या तांदळाला मोठ्या शहरांसह परदेशातही मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये हा काळा तांदूळ किमान चारशे ते पाचशे रुपये किलो दराने विकला जातो. फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन साइटवर या तांदळाची विक्री 399 रुपये दराने सुरू असल्याची माहिती यावेळी अभिषेकने विद्यापीठ अधिकाऱ्यांना दिली.
तुलनात्मक अभ्यासासाठी काळ्या भारताच्या वाणाची विद्यापीठाच्या प्रादेशिक भात संशोधन केंद्रात रायगड जिह्यातील कर्जत आणि रत्नागिरी येथील शिरगाव येथे ही लागवड करण्यात आलेली आहे या काळ या तांदळाच्या वाणाचा तुलनात्मक अभ्यास करून कोकणातल्या हवामानात आणि जमिनीत त्याची वाढ कशी होईल याचा अभ्यास चालू असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱयांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यामुळे भविष्यात विद्यापीठाच्या माध्यमातून या काळ्या तांदळाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब होईल व कोकणात या भाताचे क्षेत्र अधिक विस्तार येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
कार्बोहाइड्रेट्स असलेले हे काळे तांदूळ डायबेटीस व हृदयरोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. काळे तांदूळ खाल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील नियंत्रणात येते. या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने हे पचण्यास उपयु‹ असतात हे डोळ्यासाठीदेखील उपयुक्त ठरतात. काळा तांदूळ हा स्वास्थासाठी अधिक लाभदायक आहे असे मानले जाते. देशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. 150 दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे. त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय शरीर मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो अशी माहिती सुर्वे यांनी दिली.