लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परेड : कडक कारवाई करण्याचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळय़ा यादीतील गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. रविवारी सायंकाळी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांना तंबी देण्यात आली.
पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱयांनी गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसल्याही प्रकारचा उपदव कराल तर याद राखा. आता केवळ राऊडी शिटमध्ये तुमची नावे आहेत. पुढे अशाच कारवाया सुरू राहिल्या तर कायद्याचा हिसका दाखवावा लागेल, अशा शब्दात गुन्हेगारांना तंबी देण्यात आली.
खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील 30 हून अधिक गुन्हेगार या परेडमध्ये होते. कोणत्याही क्षणी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांची परेड घेण्यात येत आहे.
सध्या तुम्ही जे काम करीत आहात, त्याच कामात स्वतःला गुंतवा. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी कारवायांत पुन्हा भाग घेऊ नका. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस दलाला तुमच्यावर कारवाई करावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाला बाँड द्यावा लागणार आहे, असेही पोलीस अधिकाऱयांनी काळय़ा यादीतील गुन्हेगारांना सांगितले.