वार्ताहर/ किणये
कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालयाच्यावतीने खास दिवाळीनिमित्त गावात किल्ला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. किल्ला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निखिल कणबरकर व ग्रुप यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक सुजल मोरे व ग्रुप यांनी तर तृतीय क्रमांक ओमकार बाचीकर व पवन कणबरकर यांनी पटकाविला.
रांगोळी स्पर्धेमध्ये लहान गटात अनुक्रमे सलोनी मोरे, दीक्षा जाधव, नंदिनी बाचीकर, प्रियांका मोरे यांनी बक्षिसे मिळविली. रांगोळी स्पर्धेत मोठय़ा गटामध्ये प्रथम क्रमांक सानिका मोरे, द्वितीय क्रमांक लक्ष्मी बुरुड व दीपाली मोरे, तृतीय क्रमांक प्रियांका कार्वेकर व समीक्षा जाधव यांनी मिळविला.
या स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच झाला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. नामदेव मोरे हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी यशवंत मोरे, धाकलू ओऊळकर, तेजस्विनी सुतार, संतोष सुतार, सूरज कणबरकर, पृथ्वी जाधव, कांचन सावंत, रेखा मोरे, कार्तिक बाचीकर, आण्णाप्पा मोरे, नारायण मोरे, भरमाण्णा मोरे, मारुती मोरे, प्रो. विक्रम नाईक आदी उपस्थित होते. मनोहर मोरे यांनी सूत्रसंचालन केले.