वार्ताहर/ किणये
कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय यांच्यावतीने किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या किल्ला स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद यळ्ळूरकर होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. आनंद आपटेकर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांची आठवण केली जाते. बालवयापासूनच शिवरायांचा आदर्श, त्यांचे संस्कार घेण्याची गरज आहे, असे प्रा. आनंद आपटेकर यांनी सांगितले.
वाचनालयाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक, ऍड. नामदेव मोरे आदींची भाषणे झाली. यावेळी स्वराज मंडळाचे अध्यक्ष दयानंद यळ्ळूरकर व गोपाळ जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मोठय़ा गटात संकेत बाचीकर प्रथम
मोठय़ा गटामध्ये संकेत बाचीकर याने वेताळ गडाची प्रतिकृती साकारून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक सूजल मोरे (सिंहगड), तृतीय क्रमांक विभागून ओम मोरे (पन्हाळा) व ज्ञानेश्वर मोरे (रायगड) यांना देण्यात आला.
लहान गटामध्ये प्रथम क्रमांक प्रेम बुरुड (सिंहगड), द्वितीय सूजल यळ्ळूरकर (प्रताप गड), तृतीय क्रमांक विभागून मारुती सुरुतकर (वर्धनगड) व परशराम मोरे (प्रताप गड) यांना देण्यात आला.
विजेत्यांना रोखरक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सूरज कणबरकर, कांचन सावंत, पृथ्वी जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोहर मोरे यांनी केले. प्रसाद जाधव यांनी आभार मानले.