वार्ताहर/ उंडाळे
भारतीय सैन्य दलात कार्यरत असणऱया उंडाळे (ता. कराड) येथील अजित पाटील या जवानाने काश्मिरी युवती सुमन देवी भगत हिच्याबरोबर विवाह केला आहे. त्यामुळे मराठमोळा अजित पाटील काश्मिरचा जावई झाला असून या अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे.
कराड तालुक्यातील उंडाळे गावातील अजित प्रल्हाद पाटील हा युवक भारतीय सैन्य दलात आर्मी एज्युकेशन इन्स्ट्रक्टर या पदावर झांसी येथे कार्यरत आहे. याच ठिकाणी अजित पाटील यांच्यासोबत काम करणाऱया काश्मिरमधील सहकारी मित्राकडे पाहुणी म्हणून आलेल्या जम्मू काश्मिरमधील किस्तवाड जिह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱया सुमनदेवी भगत या युवतीची भेट, तोंड ओळख झाली. प्रथम भेटीतच त्यांच्यात प्रेमाचे अंकुर फुटले. दोघांच्या घरातून याला संमती होती.
मार्च 2020 मध्ये सुमनच्या नातेवाईक सहकाऱयाबरोबर अजित पाटील 10 दिवसाच्या सुट्टीवर काश्मिरला गेले होते. कोरोनामुळे अचानक देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्याने तब्बल तीन महिने काशमिरमध्ये सुमन देवीच्या घरी अजित पाटील यांना राहावे लागले. याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते आणखी घट्ट झाले. सुमन देवी यांच्या घरच्यांना अजित यांना जवळून समजुन घेता आले आणि सर्वांच्या संमतीने दोघांची लग्नग्नगाठ पक्की झाली
जम्मु किस्तवाड येथील देवराज व सुनीतादेवी भगत यांची कन्या सुमन देवी व उंडाळे (ता. कराड) येथील प्रल्हाद व रंजना पाटील यांचे सुपुत्र अजित यांचा 27 नोव्हेंबर 2020 रोजी मोजक्या कराडकर नातेवाईकांच्या उपस्थितीत जम्मू कश्मिर मधील किस्तवाड येथे काश्मिरी पध्दतीने लग्नगाठ बांधली गेली. चार दिवसांपूर्वी कराडमध्ये मराठी पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी करण्यात आली.
सुमन देवी बारावीत शिक्षण घेत असुन मला महाराष्ट्रातील लोकांसह येथील राहणीमान आवडले. मुलींना येथे असणाऱया स्वातंत्र्याचे अप्रुप वाटत असल्याची प्रतिक्रिया सुमनदेवी अजित पाटील यांनी व्यक्त केली
मुलगा देशसेवेचे काम करत असुन मुलाच्या आनंद व सुखासमोर समाज काय म्हणेल याची फिकीर नसल्याची सांगत सुमन सून नव्हे तर माझी मुलगी म्हणुन या घरात आली असल्याची प्रतिक्रिया अजित यांच्या आई रंजना पाटील यांनी दिली.