‘आयनॉक्स’मध्ये चित्रपट पाहिल्यानंतर केली घोषणा
प्रतिनिधी /पणजी
‘काश्मिर फ्ईल्स’ हा चित्रपट गोव्यात करमुक्त (टॅक्स फ्ढ्रा) करण्यात येणार असून जास्तीत जास्त थिएटरमध्ये त्याचे अधिकाधिक शो दाखविण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.
सदर चित्रपट काल सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक पणजीतील आयनॉक्स थिएटरमध्ये पाहिला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की सदर चित्रपटाला काहीजण विरोध दर्शवत होते म्हणून हा चित्रपट मुद्दाम आपण पाहिला. परंतु त्यात विरोध करण्यासारखे काहीच नाही. उलट त्यात काश्मिरातील 1990 मधील इतिहास जिवंतपणे दाखवण्यात आला असून तो सर्वांनी पाहणे गरजेचे आहे.
इतिहास कळण्यासाठी चित्रपट पहावा
काश्मिरातील हिंदूवर कसे अत्याचार झाले व त्यांनी कसा लढा दिला हा इतिहास त्यात आहे. तरूण पिढीला तो समजण्याची आवश्यकता आहे. तत्कालिन काँगेस सरकारच्या काळात तेथील हिंदूवर झालेले अत्याचार हा चित्रपटाचा विषय आहे. तो खरा इतिहास असून मुलांना, युवकांना कळण्यासाठी सदर चित्रपट त्यांनी पहायला हवा, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
आयनॉक्स व्यवस्थापनाला केली सूचना
काश्मिरातील हा इतिहास सर्वांनी समजून घेतला पाहिजे. या इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये. आपण आयनॉक्स व्यवस्थापनाशी बोलणी केली असून हा चित्रपट जास्तीत जास्त दिवस जास्त शो लावून जनतेला पहाण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांना सांगितले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
विवेक अग्निहोत्री हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. काश्मिरी हिंदूनी अस्तित्वासाठी †िदलेला लढा त्यात चित्रित केलेला आहे. पूर्ण देशाला काश्मीरी हिंदूचा इतिहास कळण्याची गरज असून हा चित्रपट ती गरज पूर्ण करणारा आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.