भारतीय सैन्याची नियंत्रण रेषेजवळ मोठी कारवाई
श्रीनगर / वृत्तसंस्था
भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये 25 ते 30 किलो हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 25 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. कारवाईनंतर सर्व मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी कोणालाही अटक झाली नसली तरी बारामुल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तस्करीमध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय लष्कराच्या जवानांनी उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दोन पिशव्या जप्त केल्या. या पिशव्यांमध्ये पाकिस्तानी चिन्हांसह 25-30 किलो हेरॉईन सापडले. उत्तर काश्मीरच्या उरी येथे नियंत्रण रेषेजवळील क्षेत्रात शनिवारी रात्री उशिरा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे वरि÷ पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या कारवाईनंतर सीमेवरील जवान तस्करांच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत.