श्रीनगर हल्ल्यातून घेतला धडा : शस्त्रास्त्र हिसकावण्याचा होता कट
वृत्तसंस्था/ श्रीनगर
13 डिसेंबर रोजी श्रीनगरच्या जेवानमध्ये पोलीस बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिसांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीनगरच्या पोलीस मुख्यालायत हुतात्म्यांचे पार्थिव ठेवल्यावर पोलीस अधिकाऱयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. पुढील काळात पोलीस कर्मचारी कायम बुलेटप्रूफ वाहनातूनच प्रवास करतील अशी घोषणा काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी केली. दहशतवादी पोलिसांची शस्त्रास्त्रs हिसकावण्याच्या प्रयत्नात होते.
पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यादरम्यान दहशतवादी शस्त्रास्त्रs पळवून देण्याच्या तयारीत होते. हल्ला होताच पोलिसांनी प्रभावी प्रत्युत्तराची कारवाई केली. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला आहे. हल्ल्यात जैशच्या 3 दहशतवाद्यांचा हात असून यात 2 विदेशी एक स्थानिक दहशतवादी सामील आहे. प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत एक दहशतवादी जखमी झाला असून तो पंपोरमार्गे त्राल भागाच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली असल्याचे महासंचालकांनी सांगितले.
पूर्वनियोजित कट
आर्म्ड रिझर्व्ह फोर्सच्या 9 व्या बटालियनचे 25 पोलीस कर्मचारी संबंधित बसमधून प्रवास करत होते. जेवाननजीक सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला होता. मोठय़ा प्रमाणावर गोळीबार झाल्याने हा एक पूर्वनियोजित कटांतर्गत करण्यात आलेला हल्ला असावा असे पोलीस अधिकाऱयाने म्हटले आहे.
प्रवासादरम्यान सुरक्षेची खबरदारी
पोलीस आता एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी प्रवास करताना मोठी दक्षता बाळगत आहेत. पुढील काळात अशा प्रवासासाठी बुलेटप्रूफ बस देण्यात येणार आहे. हल्लेखोरांनी हल्ल्याच्या ठिकाणाची पूर्वीच रेकी केली होती. रस्त्यावरील गस्त पथक हटताच हल्ला घडवून आणला गेला. जैशने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे विजय कुमार यांनी सांगितले.