बारामुल्लाच्या रामपूर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या तळांचा भांडाफोड
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील रामपूर सेक्टरमध्ये सैन्याने दहशतवाद्यांच्या 2 ठिकाणांचा भांडाफोड केला आहे. सैन्याने मंगळवारी सकाळी या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. यादरम्यान तेथे मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे.
सैन्यानुसार दोन्ही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs लपवून ठेवण्यात आली होती. 7 तासांपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत सैन्याने तेथून 6 मॅगजीन आणि 1,254 राउंडचे दोन सील्ड बॉक्स आणि 5 एके सीरिजची रायफल हस्तगत केली आहे. 9 मॅगजीन आणि 6 राउंडसह 6 पिस्टल, 21 ग्रेनेड, 2 युबीजीएल ग्रेनेड आणि 2 केनवुड रेडिओ सेट सैन्याकडून ताब्यात घेण्यात आले आहेत.
सैन्याला नियंत्रण रेषेनजीक रामपूर सेक्टरच्या एका गावात सोमवारी संशयास्पद लोकांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर परिसराची देखरेख केली जात होती. सर्व्हिलान्स ग्रिडला पूर्ण भागात तैनात करण्यात आले होते. यानंतर मंगळवारी सकाळी सैन्याने परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान सैन्याला दहशतवाद्यांच्या दोन ठिकाणांचा सुगावा लागला, तेथेच शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा लपवून ठेवण्यात आला होता.
सैन्यानुसार सीमावर्ती भागात अनेक गावे आहेत. नियंत्रण रेषेच्या याच भागांमध्ये दहशतवादी शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा लपवून ठेवतात, तेथून ही रसद ओव्हरग्राउंड वर्कर किंवा दहशतवाद्यांद्वारे हँडलर्सपर्यंत पोहोचविली जातात. या शस्त्रांचा वापर दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी केला जातो.
बारामुल्लात 2 ग्रेनेड हल्ले
बारामुल्लामध्येच दहशतवाद्यांनी सोमवारी सैन्याच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. लक्ष्य चुकल्याने ग्रेनेड रस्त्यावर पडून त्याचा स्फोट झाला होता. या स्फोटात 6 नागरिक जखमी झाले होते. तर दुसऱया हल्ल्यात दहशतवाद्यांनी सोपोरमध्ये पोलीस चौकीनजीकच्या बसस्थानकाला ग्रेनेडने लक्ष्य केले होते.