ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं की, शुक्रवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यातील चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गांदरबल आणि हंदवाडा येथेही लष्कर-ए-तोयबाच्या प्रत्येकी एका दहशतवाद्याला ठार केले. तर एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. हंदवाडा आणि पुलवामा येथील चकमकी संपल्या आहेत. गांदरबलमध्ये सध्या चकमक सुरू आहे.