ऑनलाईन टीम / श्रीनगर :
भारतीय लष्कराने मागील 24 तासांत काश्मीर खोऱ्यातील विविध भागात केलेल्या कारवाईत 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या कारवाईत एक जवान शहीद झाला असून, दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने लष्करी सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे ट्विट केले आहे.
वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, मागील 24 तासांपासून काश्मीर खोऱ्यातील विविध भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत 9 दहशतवादी मारले गेले. यामध्ये दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे शनिवारी 4 दहशवादी मारले गेले. तर इतर 5 दहशतवाद्यांचा नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये खात्मा करण्यात आला. या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.