प्रतिनिधी / सातारा
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीला सांबरवाडी व पॉवर हाऊस येथे येणारे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे दूरुस्थी कामाकरता मंगळवार दि. 9 व बुधवार दि.10 रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.
ऐतिहासिक अशा कास तलावातून शहराच्या पश्चिम भागात पाणी पुरवठा केला जातो. त्या जलवाहिनीला सांबरवाडी व पॉवरहाऊस येथे येणारे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाकरता मंगळवार दि. 9 रोजी सकाळी 9 ते बुधवार दि. 10 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.