ऑलिव्ह रिडले घरटय़ांच्या डेटा संकलनासाठी एम-टर्टल ऍपची निर्मिती
प्रतिनिधी/ रत्नािगरी
मॅंग्रोव्ह फाउंडेशन-महाराष्ट्र वनविभागाच्या मॅंग्रोव्ह सेलने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिह्यातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरटय़ांच्या डेटा संकलनाचे काम सुलभ करण्यासाठी एम-टर्टल नावाचे ऍप लाँच केले आह़े या ऍपमुळे कासवांच्या घरटय़ांची माहिती आता एका क्लिकमुळे तत्काळ मिळणार आहे.
एम-टर्टल हे ऍप चिपळूणस्थित एनजीओ सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आह़े मॅंग्रोव्ह फाउंडेशनसोबत महाराष्ट्रातील समुद्री कासव संवर्धनावर काम करत आहे आणि रत्नागिरीच्या वेळासमध्ये समुद्री कासव संवर्धन कार्यक्रम सुरू करणारी राज्यातील ही पहिली संस्था आहे. या प्रक्रियेदरम्यान आम्ही घरटी व अंडी यांच्या संख्येपासून भरपूर डेटा गोळा करतो. समुद्रकिनाऱयावर कासवाच्या ट्रकच्या खुणा मोजण्यासाठी, अंडय़ांचे तापमान, पिल्लांच्या जगण्याच्या टक्केवारी हे मॅन्युअली करणे खूप कष्टाचे आहे आणि डेटा एकसमान नसल्यामुळे समस्या आल्या आहेत. एम-टर्टल ऍप कोणतेही अतिरिक्त काम काढून टाकते आणि संशोधक म्हणून आवश्यक असलेली सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते, असे मॅंग्रोव्ह फाउंडेशनचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे म्हणाले.
मॅंग्रोव्ह फाउंडेशन भविष्यात एम-टर्टल ऍपमध्ये अधिक कार्यक्षमता जोडण्याचा विचार करत आहे. उदाहरणार्थ, फाऊंडेशन सर्व घरटे व्यवस्थापकांना थर्मामीटरने सुसज्ज करण्याचा विचार करत आहे आणि त्यांना ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरटय़ांचे तापमान, घरटय़ाच्या सभोवतालच्या वाळूसह लॉग इन करण्यास येणार आह़े हा सर्व डाटा पिल्लांचे लिंग ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावते. डेटा परिपूर्ण नसेल पण भविष्यातील अभ्यासासाठी तो आम्हाला एक ढोबळ आधाररेखा देईल आणि तो ऍपवर प्रतिबिंबित होऊ शकतो, असे कर्वे यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या हंगामात, घरटे व्यवस्थापकांनी आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त 10 ऑलिव्ह रिडले कासवांची घरटय़ांची स्थाने ओळखली आहेत, ज्यात सिंधुदुर्ग जिह्यातील समुद्रकिनाऱयावर घरटे बांधण्याचे आतापर्यंत अज्ञात स्थानाचाही समावेश आहे. महाराष्ट्रात सागरी कासवांच्या चार प्रजातींची नोंद आहे तर ऑलिव्ह रिडले कासव ही एकमेव प्रजाती आहे जी राज्यात घरटी करतात आणि ऑलिव्ह रेडले अंडय़ातून बाहेर येणाऱया पिल्लांची संख्याही सर्वात जास्त आहे. जागतिक स्तरावर या प्रजाती लुप्त होण्याची भीती आह़े
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कासवांच्या घरटय़ांची संख्या 2020च्या तुलनेत 2021 साली दुप्पट झाली होती. निरीक्षणाद्वारे एकूण 451 घरटी स्थळांची नोंद करण्यात आली होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 288 वरून वाढली होती. गेल्या 6 वर्षांत घरटय़ांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आह़े 2017 मध्ये कोकणातील तीन जिह्यांमध्ये फक्त 75 घरटय़ांची नोंद झाली होत़ी
–भाऊ काटदरे नावाने फोटो
डेटा नेमकेपणाने उपयोगात आणणे सोपे होणार
आतापर्यंत आपण ऑलिव्ह रिडले कासवांचा डेटा मॅन्युअली ठेवत होत़ो त्यामुळे याची मॅनेजमेंट ठेवणे खूप कठीण होत़े आता रिअल टाईममध्ये एका क्लिकवर हा डेटा एम-टर्टल या ऍपच्या माध्यमातून जगातून कोठेही ऍक्सेस होवू शकत़ो त्यामुळे कासवांचा संपूर्ण डेटा नेमकेपणाने उपयोगात आणणे सहज सोपे होणार आह़े
–भाउढ काटदरे, अध्यक्ष, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था