वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरीस
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या अर्जेंटिना खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रूडने अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. रूडने ही स्पर्धा दुसऱयांदा जिंकली आहे.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात रूडने शुवार्त्झमनचा 5-7, 6-2, 6-3 असा पराभव केला. हा अंतिम सामना जवळपास तीनतास चालला होता. रूडचे एटीपी टूरवरील हे सातवे विजेतेपद आहे. 2021 च्या टेनिस हंगामात रूडने एटीपी टूरवरील पाच स्पर्धा जिंकल्या होत्या. रूड सध्या एटीपीच्या मानांकनात आठव्या स्थानावर आहे.