शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स व पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला
प्रतिनिधी / सातारा
कासकडे फिरायला गेलेल्या एक युवती आणि दोन युवकांची कार गणपती मंदिर नजीक रस्त्याच्या कठडा तोडून दरीत कोसळली असुन या कारचा नंबर एम एच १२ जी एफ ०१७९ असा असुन, सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात युवतीचा मृत्यू झाला तर दोन युवक जखमी झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स मदतीला धावून गेले. सायंकाळी उशिरापर्यंत त्या युवतीच्या मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सूरु होते.