आमदार शशिकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला
प्रतिनिधी/ सातारा
कोरेगाव नगरपंचायतीत कॉग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. त्यामुळे नगरपंचायतींचा चांगला निकाल लागून जिह्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळले. नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढायचे अशी आमची इच्छा होती. पण काही लोकांचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, असे मत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी ओबीसींच्या जागांसाठी मतदान झाले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे दोघेही ठाण मांडून होते. एकूणच या निवडणुकीविषयी आमदार शशिकांत शिंदेनी माध्यमाशी संवाद साधताना म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले वातावरण आहे. ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आम्ही संधी देऊन नवीन चेहरे दिले आहेत. मागील काही वर्षाच्या नगरपंचायतीच्या कारभारावर लोकांत नाराजी होती. आम्ही चांगला प्रचार केला, त्यामुळे लोकांचा पाठींबा मिळाला आहे. लोकांच्या आशिर्वादाने निकाल चांगला लागेल, असा विश्वास आ. शिंदे यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांचा जोश वाढावणे गरेजेच
पाटण, कोरेगाव, खंडाळा, लोणंद, वडूज, दहिवडी या सहा ठिकाणी निवडणूक होत असून येथे राष्ट्रवादीला चांगले यश येईल अशी आशा आहे. कार्यकर्त्यांना जोश येण्यासाठी आम्ही थांबलो आहोत. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर स्वतंत्र निर्णय घ्या, अशी सूचना केली होती. आम्ही निर्णय घेतला. महाविकास आघाडी करून लढायचे, अशी आमची इच्छा होती. पण, काही लोकांचा स्वभाव आम्ही बदलू शकत नाही. कोरेगाव नगरपंचायतीत कॉग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे.
ती त्यांच्या पक्षाची भूमिका
जिल्हा बॅंकेची निवडणूक वेगळी होती. ही स्थानिक पातळीवरील प्रश्नांची निवडणूक आहे. तरीही आपल्या लोकप्रतिनिधींवर अन्याय झाला, त्याचा फायदा होऊ शकतो. †िंशवसेनेने पहिल्यापासून चिन्हावर निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. पण पूर्णपणाने शिवसेनेचे पॅनेल कोरेगावात उभे राहिलेले दिसत नाही.