ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन चा अवधी तीन मेपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. मात्र तरीही काही लोक बाहेर पडून स्वतः चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. अशा लोकांवर बॉलिवुडचा दबंग खान सलमान खान चांगलाच भडकला आहे.
सलमान खानने एक व्हिडिओ इंस्टा वर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. यामध्ये सलमान खान सांगतोय की, कोरोनाच्या या भयंकर संकटात डॉक्टर, नर्स आपल्या जीवाची जोखीम पत्करून आपले प्राण वाचवत आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर दगडफेक करत आहेत, काही कोरोनाचे रुग्ण हॉस्पिटल मधून पळून जात आहेत.
तुम्ही कुठल्या दिशेला पळत आहात? जीवनाकडे की मृत्यकडे? जर डॉक्टरांनी तुमचे प्राण वाचवले नाही, पोलिसांनी तुम्हाला बाहेर पडताना रोखले नाही आणि ज्यांना वाटते आपण बाहेर पडलो तर काही होणार नाही ते स्वतः बरोबर अनेकांचा जीव धोक्यात घालत आहेत.
या अशा काही जोकर्स मुळे देशात कोरोना पसरत आहे. तुम्ही नीट वागला तर पूर्ण स्थिती सुधारेल. मात्र असेच बाहेर पडत राहिलात तर सर्वांना घरात बसावं लागणार आहे. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते.. असं ही सलमानने म्हटले आहे.