सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी खासकीलवाडा (शाळा नंबर ४ नजीक) येथील रहिवासी उमेश शशिकांत सावंत (वय ४५) यांचे २५ जून रोजी रात्री निधन झाले. गेले काही दिवस ते कावीळ आजाराने त्रस्त होते. काॅग्रेसचे कट्टर कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. तसेच ते मार्केटिंग जाॅब करत होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे.