प्रतिनिधी / उचगाव
उचगाव (ता.करवीर ) पैकी यादववाडी मणेरमळा परिसरात डेंग्यूसद्रुश्य रुग्णांची संख्या वाढती असुन या परिसरात १५ ते २० लोकांना डेंग्यूसद्रुश्य लक्षणे आहेत. उचगांव व शहरात अनेक खाजगी दवाखान्यात डेंग्यूचे रुग्ण दाखल होत आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर या परिसरात डेंग्यूसद्रुश्य साथ आल्याने भितीचे वातावरण बनले आहे. आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष आहे अशा संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या. खाजगी दवाखान्यात अनेकांचे डेंग्यू पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
यादव वाडी तसेच साईनाथ कॉलनी येथे एकाच घरात चार पाच रुग्ण असे वीस रुग्ण परिसरात आहेत. तसेच उचगाव मध्ये सावंत गल्ली, धनगर गल्ली तसेच गावातील सर्व भागात कमी जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष्य घालण्याची मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.