ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये मागील काही दिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आज एक दिलासा देणारी बातमी आली आहे. कोरोना रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात तब्बल 6,863 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 6,287 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
असे असले तरी आज दिवसभरात 101 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. ही चिंताजनक बाब आहे. दरम्यान, शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 86 हजार 327 वर पोहोचली आहे. त्यातील 3,02,480 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 76 हजार पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु
सद्य स्थितीत नागपूरमध्ये 76, 721 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 7,126 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे शहरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.