‘महारानी’चा टिझर प्रदर्शित- हुमा कुरैशीच्या लुकला पसंती
अभिनेत्री हुमा कुरैशी लवकरच महारानी या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. बिहारच्या सत्य राजकीय घडामोडींवर आधारित या सीरिजचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हुमा कुरैशी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची व्यक्तिरेखा साकारत असल्याचे टिझर पाहून स्पष्ट होते. निर्मात्यांकडून यासंबंधी कुठलाच दावा करण्यात आलेला नाही.
महारानीच्या टिझरमधील हुमाच्या लुकने सर्वांनाच प्रभावित केले आहे. साडी, कपाळावर टिकली आणि कुंकू अभिनेत्रीचे हे स्वरुप पाहून सर्वजण त्यांना बिहारची मुलगी ठरवत आहेत. हुमाच्या बोलण्याचा अंदाज त्यांच्या व्यक्तिरेखेला अधिक प्रभावी करत आहे. एका निरक्षर महिलेने कशाप्रकारे किचनच्या चार भिंतींमधून बाहेर पडत बिहारच्या मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास केला हे टिझरमध्ये दाखविण्यात आले आहे. सीरिजमध्ये हुमाच्या व्यक्तिरेखेचे नाव रानी भारती ठेवण्यात आले आहे.
या सीरिजची निर्मिती सुभाष कपूर आहेत. या सीरिजमध्ये अभिनेता सोहम शाहही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सीरिजसह हुमा कुरैशी आता अक्षय कुमारसोबत बेल बॉटम या चित्रपटातही दिसून येणार आहे.