वार्ताहर/ किणये
किणये ग्राम पंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. या निवडणुकीत दोघा माजी सदस्यांनी बाजी मारली. तर उर्वरित नवीन चेहऱयांनाच मतदारांनी आपली पसंती दर्शविली. शुक्रवारी किणये ग्रा. पं. मध्ये नूतन सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
किणये ग्रा. पं. मध्ये किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, नावगे, जानेवाडी, बामणवाडी या गावांचा सामवेश आहे. एकूण 22 जागांपैकी नावगे गावातील एक व रणकुंडयेतील एक जागा बिनविरोध आली होती. उर्वरित 20 जागांसाठी 62 उमेदवार रिंगणात होते. या पंचायतीमधील गावांमध्ये ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातूनच अधिक प्रमाणात निवडणूक झाली. मतदान अत्यंत चुरशीने झाले होते. 7 वॉर्ड आहेत. एकूण 6807 मतदानापैकी 5902 इतके मतदान झाले होते.
प्रत्येक गावांमध्ये अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली. किणये गावात मारुती खोबाणा डुकरे यांनी सलग चौथ्यांदा निवडणुकीत बाजी मारली. किणये गावातील विजयी झालेले नूतन ग्रा. पं. सदस्य-अरविंद आप्पासाहेब कीर्तने, वर्षा विजय डुकरे, मारुती खोबाण्णा डुकरे, श्रीधर रामलिंग गुरव, पानू परशराम गुरव, हेमंत पुंडलिक पाटील, बहाद्दरवाडी (शिवनगर) येथील नूतन सदस्य रेखा व्हळाप्पा नाईक, शकुंतलाबाई परशराम पाटील, मल्लाप्पा विष्णू पाटील, रणकुंडये गावातील नूतन सदस्य सुलोचना परशराम कोलकार, गौसबी नुरसाब ताशिलदार, भरमाण्णा यल्लाप्पा पाटील, नावगे गावातील नूतन सदस्य परशराम यल्लाप्पा शहापूरकर, शिल्पा सातेरी कामती, अर्चना रामलिंग चिगरे, अप्पुनी यल्लाप्पा पाटील, बामणवाडी व जानेवाडी या दोन गावातील नूतन सदस्य शकुंतला संजय हणबर व प्रियांका पुंडलिक पायाण्णाचे हे आहेत. कर्ले गावातील नूतन सदस्य स्नेहल शंकर लोहार, रंजना सुरेश भास्कर, वसंत गोविंद सांबरेकर, विनायक रावजी पाटील आहेत. या सर्व नूतन सदस्यांना ग्रा. पं. मध्ये प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पीडीओ सुनीता पाटील व कर्मचारी उपस्थित होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते व समर्थकांनी अगदी शांततेत विजयाचा जल्लोष केला