वार्ताहर /किणये
सोमवारपासून सुरू झालेल्या दुर्गामाता दौडला तालुक्मयात विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. किणये गावात मंगळवारपासून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. शिवप्रति÷ान हिंदुस्थान किणये विभागप्रमुख निवृत्ती डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दौडची सुरुवात झाली आहे.
प्रारंभी पुंडलिक दळवी यांच्या हस्ते गणेशमूर्तीचे पूजन करण्यात आले. शिवपुतळय़ाचे पूजन शिवाजी नारायण उंदे यांच्या हस्ते झाले. अनिल पाटील यांनी ध्वजपूजन केले. शस्त्रपूजन पुंडलिक गुरव, सूरज खन्नुकर, विनायक खामकर यांच्या हस्ते करून दौडला सुरुवात करण्यात आली. यावेळी मारुती डुकरे, हेमंत पाटील आदींची भाषणे झाली. दौडच्या निमित्ताने गावातील प्रत्येक गल्लीमध्ये आकर्षक रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. महिला आरती ओवाळून दौडचे स्वागत करीत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ब्रह्मलिंग मंदिर येथे मंगळवारच्या दौडची सांगता झाली.
सावगावात उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवप्रति÷ान हिंदुस्थान शाखा सावगाव यांच्यावतीने आयोजित दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मंगळवारी दौडमध्ये सावगावात तरुण व तरुणींचा लक्षणीय सहभाग दिसून आला. पहाटे शिवस्मारक येथे शिवपुतळय़ाला कलमेश्वर गल्लीतील शिवभक्तांकडून अभिषेक व नित्य पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रेरणामंत्र म्हणून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय.. अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. गावातील प्रमुख मार्गांवर जाऊन महालक्ष्मी नगर परिसर व मिलिट्री क्वॉर्टर्स येथे दौडची सांगता झाली.