पुतीन यांच्यावर बरसला पकडला गेलेला रशियन सैनिक
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सोमवारी 26 दिवस पूर्ण झाले. या युद्धादरम्यान रशियाच्या सैनिकांचे मनोबल खचले असल्याचा दावा अनेक वृत्तसंस्थांकडून करण्यात आला आहे. रशियाचे निराश सैनिक आता घरी परतू इच्छित आहेत, याकरता ते स्वतःवर गोळी झाडून घेत जखमी होण्यासही तयारत आहेत. आता युक्रेनमध्ये पकडले गेलेले रशियाचे सैनिक आता स्वतःच्या देशातील नागरिकांना पुतीन यांच्याविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन करत आहेत. कशाप्रकारे रशियाच्या सैनिकांना सामूहिकपणे दफन केले जातेय हे या सैनिकांकडून जगाला सांगण्यात येत आहे.
इंटरफॅक्स-युक्रेनसोबत एका पत्रकार परिषदेदरम्यान रशियन सैनिकांच्या एका समुहाने स्वतःच्या सरकारच्या विरोधात आवाज उठविला आहे. अलेक्सी जेलेज्नाक, मुस्तफेव्ह मुगसाद, इगोर रुडेंगो, अलेक्झेंडर फोमेंको आणि उर्वरित सैनिक रशियाच्या हल्ल्याच्या विरोधात भूमिका मांडताना भावुक झाले. पुतीन यांनी कितीही सैन्य पाठविले तरीही रशिया युक्रेनवर कब्जा करू शकणार नसल्याचे उद्गार रशियाचा सैनिक जेलेज्नाकने काढले आहेत.
पुतीन हे खोटारडे आणि विश्वासघाती आहेत. युक्रेनच्या शहरांवर, रुग्णालयांवर आणि नागरिकांवर ते बॉम्बवर्षाव करत आहेत. परंतु युक्रेनची जनता अत्यंत शूर आहे. रशियाच्या उपकरणांना कुठल्याही शस्त्रास्त्रांशिवाय युक्रेनची जनता रोखू शकते. युक्रेनचे लोक एकजूट झाले आहेत. रशियाच्या सैन्याचे कमांडर देखील खोटारडे आणि विश्वासघाती आहेत. त्यांनी केवळ आमच्यासोबत नव्हते पूर्ण रशियासोबत विश्वासघात केला असल्याचे या सैनिकांनी म्हटले आहे.
पुतीन यांच्या दुष्प्रचाराला बळी पडू नका. रशियाची आक्रमकता शतकांपर्यंत आठवणीत राहणार आहे. रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या लोकांचे शांततापूर्ण जीन उद्ध्वस्त केले आहे. रशियाचे सैनिक पूर्वीच पराभूत झाले असून युक्रेनचे सैन्य त्यांना नष्ट करणार आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या संघर्षात 15000 सैनिक पूर्वीच मारले गेल्याचा दावा रशियाचे सैनिक मुगसाद यांनी केला आहे.
घरी परतण्याची इच्छा
युक्रेनवर हल्ल्यावर रशियात या विरोधात हजारोंच्या संख्येत लोक रस्त्यांवर उतरले होते. पुतीन यांच्या प्रशासनाकडून या लोकांना अटक करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये युद्ध लढत असलेले रशियाचे सैनिक आता घरी परतू इच्छित आहेत. याकरता ते युक्रेनच्या शस्त्रांचा शोध घेत आहेत. युक्रेनच्या बंदुकीद्वारे स्वतःच्या पायावर गोळी झाडून घेत उपचाराच्या बहाण्याने घरी परतण्याची योजना रशियाचे सैनिक आखत आहेत. अन्यथा या सैनिकांना पुतीन यांच्या डेथ स्क्वाडला तोंड द्यावे लागणार आहे.