मुंबई \ ऑनलाईन टीम
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होतील चर्चा रंगल्या असतानाच आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे. आगामी ‘राष्ट्रपती’पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचा चेहरा पुढे करावा यासाठी प्रशांत किशोर लॉबिंग करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी देखील यानिमित्ताने शरद पवारांवर निशाणा साधला. “किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा” असा टोला भातखळकरांनी सोशळ मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करताना किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा असा टोला शरद पवार यांना लगावला आहे.
यासोबतच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसते. त्याच्यामुळे अत्यंत हास्यास्पद हालचाली सुरू आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक विचारात घेतली तरी लोकसभा आणि राज्यसभेत भाजपाचं बहुमत आहे, त्यामुळे राष्ट्रपती हा भाजपाचाच उमेदवार होईल. त्यांना फक्त यातून प्रसिद्धीची ऊर्जा मिळते, याशिवाय त्यातून काही साध्य होणार नाही, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी जोरदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.