प्रतिनिधी / शिराळा
किनरेवाडी ता. शिराळा येथे सार्वजनिक पिण्याचा पाणी पूरवठा करणाऱ्या विहिरीत पडलेल्या बैलाला गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे वाचवण्यात यश आले. जेसीबी मशिनच्या साह्याने तब्बल दोन तासाच्या प्रयत्नांनी या बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
किनरेवाडी येथील सखाराम तुकाराम पाटील यांचा बैल गावातील पिण्याचा पाणी पूरवठा करणाऱ्या विहिरीत पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. दोन तासानंतर नितीन ढेरे यांच्या जेसीबीच्या साह्याने गावातील युवकांनी या बैलाला बाहेर काढले. यामध्ये गावकऱ्यांनी खूप सहकार्य लाभले.