आमदार जीत आरोलकर पर्यटन अधिकाऱयांका बजावले : आपली भूमिका स्थानिकांच्या बाजूने : पर्यटन मंत्र्यांशी चर्चा करणार
प्रतिनिधी /मोरजी
मांदे मतदारसंघातील किनारपट्टीवरील व्यावसायिकांना पर्यटन खात्याच्या अधिकाऱयांनी सतावू नये, आपण प्रथम त्यांचे हित जपणार असून याबाबतीत गप्प बसणार नाही. याभागात अधिकाऱयांना यायचे असेल तर मला आधी सांगा माझ्या लोकांना त्रास दिल्यास कदापि खपवून घेणार नाही, अशा शब्दांन मांद्रेचे आमदार जित आरोलकर यांनी अधिकाऱयांना खडसावले.
यावेळी अधिकार्यांनी जप्त केलेले पलंग आपल्यासमोर सबंधित व्यावसायिकांना परत देण्यास सांगितले. यावेळी अधिकारी हतबल झाल्याचे चित्र होते. आम्ही पर्यटन संचालकांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यासाठी आल्याचे पर्यटन अधिकारी महाले यांनी यावेळी सांगितले. मात्र आमदार आपल्या म्हणण्याशी ठाम राहिले कारवाई करायची झाल्यास मला आधी सांगा मी पर्यटन मंत्र्यांना भेटून त्यावर तोडगा काढेन. तसेच आपल्याला न कळविता यापुढे कुठलाच अधिकाऱयाने इथे येऊ नये, आमदार आरोलकर यांनी सुनावले.
मांदे मतदारसंघातील हरमल किनारी भागात स्थानिक व्यावसायिक आपले लाकडी पलंग किनाऱयावर घालून पर्यटकांची सोय करतात व व्यवसाय करतात. बुधवारी पर्यटन खात्याचे काही अधिकारी ते पलंग हटवण्याचे काम अधिकारी करीत असल्याच्या स्थानिकांनी तक्रारी आमदार जीत आरोलकर यांच्याकडे केल्या. याची दखल घेत घटनास्थळी आमदार जित आरोलकर यांनी तातडीने जाऊन अधिकाऱयांना खडसावले. स्थानिकांना सतावण्याचे प्रकार या पुढे झाल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत ते खपवून घेणार नाही. असे सांगून आमदार आरोलकर संतप्त अधिकाऱयांवर भडकले. त्यावेळी अधिकाऱयांनी सारवासारवा करीत पर्यटन संचालकांच्या आदेशावर आम्ही कारवाई करण्यासाठी आलो आहोत. आपण कायते त्यांनाच सांगा असा बचावात्मक पवित्रा घेतला. यावेळी आमदार आरोलकर यांनी अधिकाऱयांचे अजिबात एकून घेतले नाही.
बिगर गोमंतकीयांवर कारवाई केली जात नाही!
पर्यटन खाते दरवषी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कारवाई करण्यासाठी किनारी भागात अचानक भेट देतात. जे स्थानिक व्यावसायिक लाकडी पलंग घालून पर्यटकांना आरामाची सोय करतात. त्यांच्यावरच कारवाई केली जाते. मात्र बिगर गोमंतकीय दिल्ली व्यावसायिक आपल्या खासगी जागेत मोठमोठी रेस्टॉरंट क्लब हॉटेल्स उभारून किनारी भागात लाकडी पलंग घालतात. त्यांच्यावर परवाने नसतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशी तक्रार स्थानिक व्यावसायिकांनी केली.
आमदार जीत आरोलकर यांनी अधिकाऱयांना इशारा देताना सांगितले की, किनारी भागात यापुढे कुणावर कारवाई करायची असेल तर अगोदर आपल्याला सांगा. आपण संबंधित मंत्र्यांशी यावर चर्चा करणार असून अधूनमधून कारवाई करण्याची गरज नाही. स्थानिकांवर अन्याय झाल्यास आपण सहन करणार नाही असाही इशारा यावेळी आरोलकर यांनी अधिकाऱयांना दिला.
नेहमीच स्थानिकांच्या बाजूने!
आमदार जीत आरोलकर यांनी अधिकाऱयांकडे बोलताना कोणाला सांगून तुम्ही किनारी भागात आलात, आपण तुम्हाला दोन-तीन वेळा विनंती केली. परंतु, तुम्ही त्या विनंतीला मान दिला नाही. तुम्हाला कारवाई करायची असेल तर सर्व अधिकाऱयांना वरि÷ अधिकाऱयांना घेऊन या, किंवा संचालकांना घेऊन या, तुम्ही यापुढे स्थानिकांवर कारवाई कराल तर गाठ आपल्याशी आहे, असाही इशारा यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी दिलेला आहे. आपण स्थानिकांना संरक्षण देणार आहे, असे आमदार आरोलकर म्हणाले,
उचलेले लाकडी पलंग पुन्हा आणले
दरम्यान आमदार जीत आरोलकर स्थानिक व्यावसायिकांच्या बाजूने राहिल्याने या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त करीत आमदार आरोलकर यांना धन्यवाद दिले.