वृत्तसंस्था/ मेलबर्न
आयर्लंडची माजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू किम गॅरेथ हिने ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेत मेलबर्न स्टार्स संघाबरोबर नवा करार केला. या करारानुसार गॅरेथ पुढील तीन वर्षे मेलबर्न स्टार्स संघाचे प्रतिनिधित्व करेल.
बिग बॅश लीग स्पर्धेत गॅरेथने अव्वल कामगिरी केली असून तिचा या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळविणाऱया पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये समावेश आहे. गॅरेथने आपल्या वयाच्या 14 व्या वषी आयर्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. क्रिकेटच्या टी-20 प्रकारात गॅरेथने मेलबर्न स्टार्स क्रिकेट क्लबचे सरव्यवस्थापक ब्लेयर क्राऊच यांनी किम गॅरेथचे खास स्वागत केले आहे. गेल्या वषीच्या महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेत किम गॅरेथने 15 बळी मिळविले होते. किम गॅरेथला आता मेलबर्न स्टार्सचे नवे प्रशिक्षक जोनाथन बॅटी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.