ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन शुक्रवारी 20 दिवसानंतर जगासमोर आले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयीच्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे तेथील स्थानिक वृत्तसंस्थानी म्हटले आहे.
कोरियन न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांनी शुक्रवारी सुनचिओनमध्ये एका खत निर्मिती कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. यावेळी किमची बहीण किम यो जोंग या देखील उपस्थित होत्या.
मागील काही दिवसांपासून किम जोंग उन याची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून समोर आल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र, काल ते जगासमोर आल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.
किम जोंग उन त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 11 एप्रिलला ते शेवटचे लोकांसमोर आले होते. 15 एप्रिलला त्यांच्या आजोबांच्या जयंती कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा समोर आल्या होत्या.