नवी दिल्ली : वाहन कंपनी किया इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये एका डिजिटल टूलचे सादरीकरण केले आहे. ‘किया डिजी कनेक्ट’ नावाचे एक ऍप सादर केले आहे. सदरच्या ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना आवश्यक ती माहिती कंपनीकडून प्राप्त होणार आहे. किया इंडियाने दिलेल्या माहितीनुसार सदरचे ऍप हे ग्राहकांसाठी आपल्या जवळच्या डीलरशीपसोबत जोडले जाणार असून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या आधारे सर्व माहितीची देवाणघेवाण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Previous Articleशांतता असली तरीही सतर्कता अत्यावश्यक
Next Article सईच्या डान्सला लाइक्सची फोडणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.