नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी किया इंडियाच्या नव्या कॅरेन्स या गाडीकरीता पहिल्याच दिवशी 7 हजारहून अधिक जणांनी बुकिंग केले असल्याची माहिती आहे. पहिल्याच दिवशी 7 हजार 738 जणांनी ही नवी येणारी गाडी खरेदीकरीता बुक केली आहे. कंपनीने नव्या गाडीच्या बुकिंगला 14 जानेवारीला सुरूवात केली होती. बुकिंगवेळी ग्राहकांना आगाऊ 25 हजार रुपये भरावे लागणार आहेत. पहिल्याच दिवशी कॅरेन्सला लाभलेला ग्राहकांचा प्रतिसाद निश्चितच अभिमान वाढवणारा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.