मुंबई
किया इंडिया यांनी अखेर आपल्या नव्या कॅरेन्स वाहनाला भारतीय बाजारात सादर केले आहे. सदरच्या गाडीची किंमत ही 8.9 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी असणार आहे. ही किंमत सुरुवातीची सवलतीची असल्याचे कंपनीने सांगितले असून सदरच्या गाडीच्या बुकिंगलाही सुरुवात करण्यात आली आहे. ग्राहकांना सहा आणि सात सीटर कॅरेन्स वाहनाचे बुकिंग करायचे असेल तर 25 हजार रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत. सेल्टॉस, सोनेट व कार्निव्हल या तीन यशस्वी वाहनांना यापूर्वीच कंपनीने बाजारामध्ये उतरवले आहे.