नवी दिल्ली
दक्षिण कोरियाची कंपनी ‘किया’ची भारतातील कामगिरी कौतुकास्पद ठरते आहे. कारण या कंपनीने 2 वर्षाच्या कालावधीत भारतात स्पोर्टस् युटिलीटी गटातील 2 लाखाहून अधिक ‘सेल्टॉस’ कार्स विक्री केल्या आहेत. इंटरनेटवर आधारीत कनेक्टेड कार्सची संख्या यात दीड लाखाइतकी राहिली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. लाईव्ह ट्रफिक अपडेट्स रिमोटवर स्मार्टफोनच्या सहाय्याने इंजिन स्टार्ट करण्याची प्रणाली व अपघातावेळी अत्यावश्यक सेवेशी संपर्क साधण्यासाठी ऍप या सुविधा ग्राहकांना सदरच्या कारमध्ये पसंत पडल्या आहेत.