नवी दिल्ली
जानेवारी 2021 या महिन्यात देशात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. या महिन्यात हा दर 4.06 टक्के इतका असून डिसेंबर 2020 मध्ये तो 4.59 टक्के होता. याच कालावधीत औद्योगिक उत्पादनही त्याच्या मागच्या जानेवारीच्या तुलनेत 1 टक्का वाढले आहे. अन्नपदार्थांच्या महागाई दरात 1.89 टक्के वाढ झाली. हीच वाढ डिसेंबर 2020 या महिन्यात 3.41 टक्के होती. भाजीपाला आणि फळांच्या दरात घट झाल्याने महागाई दर घसरल्याचे स्पष्ट करण्यात आले.