जागतिक नकारात्मक वातावरणाचा परिणाम : रिलायन्स नफ्यात
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी आठवडय़ाच्या चौथ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक किरकोळ तेजीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
गुरुवारी दिवसभरात दोन्ही निर्देशांकामध्ये चढ उतार दिसून आला. दिवसअखेर सेन्सेक्सचा निर्देशांक 4.89 अंकांनी वाढत 55,949.10 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 2.25 अंकांच्या किरकोळ वाढीसह 16,636.90 अंकांवर बंद झाला. बाजारात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढल्याने नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने बाजारावर काहीसा दबावही दिसून आला. सदरच्या दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक 1 टक्के तेजीत होते. तर दुसरीकडे भारती एअरटेलचे समभाग नुकसानीत होते. भारती एअरटेलच्या समभागाचा भाव 4 टक्क्यांनी घसरून 586 रुपयांवर आला होता. यासोबतच महिंद्रा आणि महिंद्रा, एचसीएल टेक, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक तसेच एचयुएल यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे मारुती सुझुकी, भारतीय स्टेट बँक, पॉवरग्रीड कॉर्प, एनटीपीसी आणि टाटा स्टील यांच्या समभागांमध्ये घसरण दिसली. दिवसाच्या सत्रामध्ये धातु क्षेत्राच्या समभागांमध्ये 1 टक्क्याची घसरण झाली. एनएमडीसी समभाग 4 टक्के तर नॅशनल ऍल्युमिनीयमचे समभाग 3 टक्के घसरले.
बाजाराचे भांडवल वाढले
बीएसईवर 3,322 समभागांमध्ये व्यवहार दिसून आला. ज्यात 1,738 समभाग तेजीसह आणि 1,447 समभाग घसरणीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 242.04 लाख कोटी रुपयांवर पोहचले होते. याआधी बुधवारी सेन्सेक्सचा निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टी मात्र 10 अंकांनी वाढून बंद झाला होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- ब्रिटानिया…. 3930
- एचडीएफसी लाईफ….. 698
- बीपीसीएल…. 466
- रिलायन्स …. 2230
- महिंद्रा आणि महिंद्रा 781
- एचसीएल टेक 1167
- आयसीआयसीआय बँक 698
- श्री सिमेंट… 26556
- ऍक्सिस बँक … 746
- एचयुएल…… 2666
- नेस्ले………. 20052
- टीसीएस…… 3671
- बजाज फिनसर्व्ह 15958
- अदानी पोर्ट्स.. 721
- लार्सन टुब्रो… 1595
- एचडीएफसी 2700
समभाग घसरलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल 586
- जेएसडब्ल्यू स्टील 672
- हिंडाल्को…….. 424
- मारुती सुझुकी 6608
- पॉवरग्रीड कॉर्प 173
- एसबीआय ….. 410
- कोल इंडिया…. 137
- सनफार्मा……. 760
- एनटीपीसी….. 112
- टाटा स्टील… 1375
- अल्ट्राटेक सिमेंट 7307
- डॉ. रेड्डीज लॅब्स 4503
- हिरोमोटो कॉर्प 2647
- टेक महिंद्रा… 1449
- युपीएल……… 719
- आयटीसी……. 204
- ग्रेसिम……… 1439
- आयओसी……. 105
- इन्फोसिस…. 1727
- विप्रो…………. 628
- इंडसइंड बँक. 1001
- टायटन…….. 1815
- एसबीआय इन्शु. 1151
- डिव्हीस लॅब्स 4846
- बजाज फायनान्स 6931