बांधणीसाठी सुरुवात- विजय सरदेसाई-नारळघरोघरीपोचविणार
प्रतिनिधी /म्हापसा
हळदोणा मतदारसंघातून किरण कांदोळकरांच्या नेतृत्वाखाली गोवा फॉरवर्ड पक्ष बांधण्यासाठी शुक्रवारपासून तयारी केली आहे अशी माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी हळदोणा येथे नागरिकांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी किरण कांदोळकर, थिवीच्या उमेदवार कविता कांदोळकर, नास्नोळा पंच सतीश गोवेकर, हळदोणा पंच प्रियंका पिंटो, बस्तोडा पंच सोनिया सागर साळगावकर आदी नागरिक उपस्थित होते.
ते म्हणाले आजपासून आम्ही नारळ घेऊन हळदोणा घरोघरी पोचविणार आहे. कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासावर आम्ही पुढे जाणार आहोत अशी माहिती यावेळी श्री. सरदेसाई यांनी दिली. आम्ही फॉरवर्ड जाणारच.
थिवीच्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमतांनी विचार केला आहे की महिलांना गोवा फॉरवर्ड पक्षातून प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी थिवीतून त्या ठिकाणची गोवा फॉरवर्ड पक्षाची जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर योग्य उमेदवार आहे. थिवीत पुन्हा किरण म्हणण्याची गरज नाही तेथे कविताच निवडून येईल असे श्री. सरदेसाई यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. पक्षपातळीवर आमचे कार्य जोमाने सुरू असून उद्या निवडणुका झाल्यातरी आम्ही यासाठी सज्ज आहोत असे किरण कांदोळकर म्हणाले.