प्रतिनिधी/ बेळगाव
अयोध्या येथील श्रीराम मंदिर पुनर्बांधणी भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला. या निमित्त बेळगाव भाजप नेते किरण जाधव यांच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहराच्या विविध मंदिरांमध्ये जाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गजेश नंदगडकर यांच्यावतीने शनिवार खूट येथील महादेव आर्केड, भाजप ओबीसी मोर्चातर्फे गेंधळी गल्ली येथील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने मीरापूर गल्ली येथील राम मंदिरामध्ये महाआरती, पूजा व प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी गजेश नंदगडकर, हनुमंत कागलकर, संतोष पेडणेकर, विजय कदम, शेष जवळकर, राजन जाधव, चेतन नंदगडकर, निना टोपण्णावर, सुवर्णा पाटील, कांचन कोपर्डे, विनायक मुचंडीकर, शिव बालाजी यासह भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, गल्लीतील पंच मंडळी उपस्थित होती.