प्रतिनिधी/ बेळगाव
तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक आणि लोकमान्य समुहाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांची मुलाखत माय एफएम रेडिओ चॅनेलवर ‘एक मुलाकात’ या कार्यक्रमात दि. 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रक्षेपित होणार आहे. ही मुलाखत ‘माय एफएमच्या’ औरंगाबाद (94.3), नाशिक (104.2), अहमदनगर (104), अंकोला (94.3), नांदेड (94.3), धुळे (95), सांगली (104), सोलापूर (95), जळगाव (94.3) वरुन प्रक्षेपित होणार आहे.