प्रतिनिधी /मडगाव
मडगाव मतदारसंघातून दिगंबर कामत यांनी सलग 7 वेळा विजय संपादन केल्याने लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटचीचे संस्थापक अध्यक्ष तथा तरूण भारत चे समुह प्रमुख व सल्लागार किरण ठाकुर यांनी अभिनंदन केले व त्यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दिगंबर कामत यांनी 1994 साली भाजपच्या उमेदवारीवर सर्व प्रथम मडगाव मतदारसंघातून विजय संपादन केला होता. त्यानंतर सलग त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते तीन वेळा भाजपच्या उमेदवारीवर तर चार वेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर मडगाव मतदारसंघातून विजयी झाले आहे.
किरण ठाकुर व दिगंबर कामत यांच्या दरम्यान, कोविड महामारी तसेच इतर विषयांवर चर्चा झाली. गोव्यातील राजकारणावर देखील भाष्य झाले.