एलसीबीची कारवाईत १ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त
अक्कलकोट : प्रतिनिधी
किरनळ्ळी ता.अक्कलकोट येथे दुपारी तीनच्या सुमारास अवैध दारूभट्टी वर छापा मारून एक लाख ५९ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शंकर सायबणप्पा गुमते, वय- ५२ , रा. किरनल्ली ता. अक्कलकोट यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यात असलेला हातभट्टी दारू व गुळमिश्रित रसायन जागेवरच नष्ट केले. याची उत्तर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला असुन याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे किरनल्ली, तालुका अक्कलकोट येथे अवैध दारूभट्टी वर छापा मारला. आरोपीकडुन १८००लिटर गुळमिश्रित रसायन किंमत ७२ हजार रुपये , २ इलेक्ट्रिक मोटारी, १८०० किलो गुळ किंमत अंदाजे ७२ हजार रुपये, १०० लिटर हातभट्टी दारू, लोखंडी बॅरल व हातभट्टी दारू तयार करणेसाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण एक लाख ५९ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हातभट्टी दारू व गुळमिश्रित रसायन जागेवरच नष्ट केले. सदरची कामगिरी पो नि सुहास जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पो उपनि शैलेश खेडकर, हेडकान्स्टेबल आबा मुंढे, हेडकान्स्टेबल विजय भरले, पोलीस सचिन मागाडे, अनिसा शेख यांनी केली आहे . सदर बाबत अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे भा द वि 328, सह दारूबंदी अधिनियम 65(ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.