मुंबई : प्रतिनिधी
‘झेड’ श्रेणीचे सीआयएसएफ सुरक्षा कवच असलेले आणि मुंबईत विक्रांत नौसेना गैरव्यवहार प्रकरणात नाव असणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे विचारणा करणार आहे. अशी माहीती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पिता-पुत्रांनी नौदलाचे विमानवाहू जहाज विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली जमा केलेल्या ₹ 57 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. तसेच राऊत यांनी आरोपांच्या भितीने सोमय्यांनी महाराष्ट्रातून पळ काढून “भाजपशासित राज्ये गुजरात किंवा गोव्यात” लपले आहेत. यावर भाजप नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
सोमय्या यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहिले आहे का, असा प्रश्न मंगळवारी काही पत्रकारांनी वळसे पाटील यांना विचारला असता, गृहमंत्री म्हणाले की, “केंद्राची सुरक्षा असलेला माणूस कुठे आहे, हे आम्ही केंद्रालाच विचारू.”