प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटूंबियांनी मनी लाँडरींग, बेनामी व्यवहाराद्वारे 127 कोटीचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या सोमवारी (20 रोजी) कोल्हापूर दौऱयावर येणार आहेत. सकाळी 7.30 ते रात्री 8.15 वाजेपर्यंत हा दौरा होणार आहे. विशेष बाब म्हणजे मंत्री मुश्रीफ यांच्या कागल येथील संताजी घोरपडे साखर कारखान्याला बाहेरुन भेट देऊन माहिती घेणार आहेत. घोटाळ्याच्या आरोपानंतर सोमय्या थेट कोल्हापूरात येणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमय्या यांचा पुतळा दहन, जोडे मारो आंदोलन करून तीव्र निषेध केला जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून सोमय्या यांच्याविरोधात मोठा रोष असतानाही ते कोल्हापूर दौऱयावर येत असल्यामुळे संपूर्ण जिह्याचे लक्ष वेधले आहे. भाजपच्या पदाधिकाऱयांनी दिलेल्या दौऱयानुसार सोमवारी सकाळी 7.30 वाजता सोमय्या रेल्वेस्टेशनवर येणार आहेत. 8 वाजता वृषाली हॉटेलमध्ये पोहोचतील. 8.30 वाजता भाजपचे सरचिटणीस दिलीप मेत्राणी यांच्या घरी नाष्टा, चहापान करतील. 9 ते 9.30 या वेळेत अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. 9.45 वाजता भाजप कार्यालयातील प्रदर्शनाची पाहणी करतील.
10 वाजता कागल येथील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्याची पाहणी करण्यासाठी रवाना होणार आहेत. 11.30 ते 12 या वेळेत कारखान्याची बाहेरून पाहणी केल्यानंतर मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये 12.45 पर्यंत थांबणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा कोल्हापूरला रवाना होतील.2 ते 3 या वेळेत हॉटेल आयोध्या येथे भोजन करतील. 3.15 ते 3.45 या वेळेत पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर 4 ते 5 या वेळेत त्यांची पत्रकार बैठक होईल. 5.15 ते 5.45 ग्रामीण पदाधिकाऱयांची बैठक तर 6 ते 6.30 दरम्यान भाजपच्या शहर पदाधिकाऱयांची बैठक होणार आहे. रात्री 8.15 वाजता ते रेल्वे स्टेशनकडे रवाना होतील.