प्रतिनिधी/ पणजी
एसयूवी सेगमेंटमध्ये त्यांची उपस्थिती अधिक बळकट करण्यासाठी आणि तरूण ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी, टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज (TKM) त्यांची नवीनतम टोयोटा अर्बन प्रुझर सादर केली आहे. टोयोटा अर्बन क्रूजर ही टोयोटा ग्लान्झा या प्रीमियर हॅचबॅकच्या भरघोस यशानंतर जागतिक टोयोटा-सुझुकी युतीच्या अंतर्गत भारतात लाँच केले जाणारे दुसरे मॉडेल आहे.
नवीनतम अर्बन प्रुझरमध्ये नवीन शक्तिशाली के-सिरीज इंजिन आहे. हे 1.5 लीटरचे चार सिलेंडर वाले पेट्रोल इंजित आहे. ज्यामध्ये इंधन कार्यक्षमतेसाठी मॅन्युअल ट्रांसमिशन (एमटी) 17.03 केएमपीएल आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशन (एटी) 18.76 केएमपीएल असे दोन पर्याय देखील उपलब्ध आहे. कॉम्पॅक्ट एसयूवीमध्ये सर्वोच्च वैशिष्टय़े आहेत ज्याची मागणी आजचा प्रत्येक ग्राहक त्यांच्या कारसाठी करतो. या व्यतिरिक्त हे तरूणांना टोयोटा एसयूवी कुटुंबात लवकर प्रवेश करण्याची परवानगी देते आणि टोयोटाच्या विक्री आणि विक्रीनंतरच्या प्रसिद्ध जगतिक मानकांचा अनुभव देखील प्रदान करते. नेहमीप्रमाणेच टोयोटासाठी ग्राहकांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे. अर्बन क्रूझर डय़ुअल एयरबॅग्स, आणि ईबीडीसह एबीएस ऍंडवांस बॉडी स्टक्चर इलेक्ट्रोक्रोमिक आईआरवीएम, हिल होल्ड कंट्रोल, ऑडिओमध्ये डिसप्लेसह रीवर्स पार्पिंग कॅमेरा आणि आईएसओएफआईएक्स चाइल्ड सीट रेसट्रेन्ट सिस्टमसह उपलब्ध आहे.
टोयोटा अर्बन प्रुजरसाठी बुकिंग सुरू झाली असून ग्राहक ऑनलाईन (www. toyotabharat.com) किंवा जवळच्या टोयोटा डिलरशिपला भेट देऊन बुकिंग करू शकतात.