अजिंक्यताऱयावर दुसऱया दिवशीही दगडावर गुलाल, वनविभागाकडून कारवाईची अंनिसकडून मागणी
प्रतिनिधी/ सातारा
किल्ले अजिंक्यताऱयावर कालच अघोरी प्रकाराची विद्या केल्याचा प्रकार घडल्याची बाब निदर्शनास येताच आज सकाळी व रात्री काही जणांनी किल्ल्याच्या महादरवाजा लगतच वाहिलेला गुलाल आणि केंबडय़ांची पखे, दारुची बाटली पडलेली दिसली. गडाच्या परिसरात होत असलेल्या या आघोरी प्रकाराबाबत चिंता व्यक्त होत असून ऐतिहासिक अशा व पुरोगामी समजल्या जाणाऱया साताऱयाच्या किल्ले अजिंक्यताऱयावर करणी, आघोरी प्रथेचा प्रकार घडत असल्याने त्यावर वन विभागाने लक्ष ठेवून असे कृत्य करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे.
किल्ले अजिंक्यताऱयावर दुर्गप्रेमी, एतिहासप्रेमी सातारकर दररोज जात असतात. परंतु काही विघ्नसंतोषी मंडळी गडावर व गडाच्या परिसरात आघोरी प्रथा, करणीसारखे, देणगतीसारखे प्रकार करण्यासाठी जातात. गेल्या दोन दिवसापासून गडावर जे आढळून येत आहे. त्यावरुन चिंता व्यक्त होत आहे. अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धेची चळवळ ज्या साताऱयातून सुरु करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याच साताऱयात चुकीचे प्रकार होवू लागले असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली. गुरुवारी सकाळी गडावर सोललेल्या बकऱयांची कातडी झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आली होती. लिंबे, नारळ, हळद, कुंकू, शिजवलेला भात असे विदारक चित्र तेथे अंनिसचे प्रशांत पोतदार यांना पहायला मिळाले. त्यांनी हा करणीचाच प्रकार असल्याचे सांगून संबंधितांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.