यश मिळवणारी मुग्धा थत्ते ठरली कोकणातील पहिली विद्यार्थिनी
राजेश जाधव/ चिपळूण
किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षेत चिपळूणच्या मुग्धा आशीर्वाद थत्ते हिने कोकणच्या यशाचा झेंडा रोवला आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांमधून तिने 1197 वी रँक मिळवली आहे. ही परीक्षा सुरू झाल्यापासून असे यश मिळवणारी ही चिपळूणची सुकन्या कोकणातील पहिली ठरली आहे. तिने या परीक्षेचा अभ्यास कोणतेही खास क्लास न लावता केला असून तिला तज्ञ प्राध्यापक व डॉक्टर आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
मुग्धा ही लहानपणापासूनच हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण एसपीएममध्ये झाले असून तिने 10वी इयत्तेतही घवघवीत यश मिळवले होते. अनेक स्पर्धा परीक्षांमध्येही यशाची चमक दाखवली आहे. सध्या ती आर. सी. काळे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. येथे 11 वी व 12 वीच्या स्टार बॅचमधून ती शिकत होती. येथे तिला प्रा. माळी व मुंबईतील नामांकित प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे. देशात सर्वात मोठय़ा असणाऱया इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ बेंगलोर या महाविद्यालयाच्या माध्यमातून ती किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षेला बसली होती. ही परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र या विषयांसाठी होते. देशपातळीवर होणाऱया या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. त्यातून 2 हजार विद्यार्थ्यांची निवड होते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयएससी व आयसर येथे प्रवेश घेता येतो. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएचडीपर्यंत सायन्समधून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना दरवर्षी 80 हजार रूपयांची स्कॉलरशिप मिळते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षेसाठी यावर्षी लाखो विद्यार्थी बसले होते. त्यातून मुग्धाने 1197वी रँक मिळवून यश संपादन केले आहे. असे यश मिळवणारी ती कोकणातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. ही परीक्षा सुरू होऊन 8 ते 10 वर्षे झाली आहेत. मात्र त्यात रँक मिळवण्यात कोणालाही यश आलेले नाही.
भावाच्या पावलावर पाऊल
मुग्धा हिचा भाऊ अग्वेत हा पुणे येथे फिजिक्स विषयातून शास्त्रज्ञ होत आहे. पाच वर्षांचा असलेला हा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याची चार वर्षे पूर्ण झाली असून हे वर्ष शेवटचे आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेऊन मुग्धा शैक्षणिक वाटचाल करीत आहे.
डॉक्टर आई-वडिलांचे मार्गदर्शन
मुग्धाचे वडील डॉ. आशीर्वाद थत्ते हे चिपळुणातील नामांकित स्त्राrरोग तज्ञ आहेत, तर आई डॉ. आदिती थत्ते यांचेही हॉस्पिटल आहे. या दोघांचेही मुग्धाला मार्गदर्शन लाभत आहे.
मुग्धा होणार शास्त्रज्ञ
मुग्धा आता पुणे येथे पुढील प्रवेश घेणार असून पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ती सायन्समधून शास्त्रज्ञ होणार आहे. त्यामुळे तिच्या भावी वाटचालीसाठी प्राध्यापकवर्ग, नातेवाईक, मित्रमंडळी शुभेच्छा देत आहेत.