ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील दहशतवादी अड्डा जम्मू पोलिसांनी उध्वस्त केला. त्या ठिकाणावरील 25 जिलेटीन स्टिक्स, 3 डिटोनेटर पिन, दोन पिशव्या आणि इतर आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेतले आहे.
किश्तवाड जिल्ह्यातील दुल जंगल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जम्मू पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्याम, पोलिसांनी दहशतवाद्यांचा एक छुपा अड्डा उध्वस्त केला. तसेच त्याठिकाणावरील जिलेटीनच्या 200 ग्रॅम वजनाच्या 18 कांड्या तर 390 ग्रॅम वजनाच्या 7 कांड्या हस्तगत केल्या. तसेच तेथील काही आक्षेपार्ह साहित्यही ताब्यात घेतले. जम्मू पोलीस याबाबाबत अधिक तपास करत आहेत.