ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील छातरू भागात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर आज दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ छातरू भागात शोधमोहीम हाती घेतली असून, सीआरपीएफ जवानांनाही पाचारण केले आहे.